ट्रान्सपोर्ट नगरीतील हाँटेलमध्ये बेकायदेशीर दारू

0
361

निगडी, दि. २८(पीसीबी)-निगडी येथील ट्रान्सपोर्ट नगर ह्या ठिकाणी दहा ते पंधरा हाँटेलमध्ये बेकायदेशीर दारू खरेदी विक्री व्यवहार सुरू असून त्या हाँटेलमध्ये अवैध बिना परवाना दारू खरेदी विक्री व्यवहार सुरू असून त्या संदर्भात राज्य उत्पादन शुल्क अधिकारी गप्प का बसले आहेत निगडी येथील ट्रान्सपोर्ट नगर आकुर्डी रेल्वे स्टेशन थरमकस चौक सेक्टर २२ निगडी सिग्नल ह्या ठिकाणी अवैध दारू खरेदी विक्री व्यवहार सुरू असून त्या संदर्भात पिंपरी चिंचवड शहरातील राज्य उत्पादन शुल्क अधिकारी गप्प का बसले आहेत, असा आरोप भाजपचे शहर पदाधिकारी सचिन काळभोर यांनी केला आहे.

निवेदनात ते म्हणतात, पोलिस अधिकारी व कर्मचारी ह्यांना हाताशी धरून अवैध दारू हाँटेलमध्ये खरेदी विक्री व्यवहार सुरू असून रात्री एक दोन वाजेपर्यंत हाँटेलमध्ये दारू खरेदी विक्री सुरू अस्तो. राज्य उत्पादन शुल्क अधिकारी गप्प बसले आहेत. पोलिस बघ्याची भूमिका घेत आहेत भक्ती शक्ती उद्यान निगडी लॉटरी स्टॉल आकुर्डी रेल्वे स्टेशन सेक्टर २२ थरमकस चौक तिवेणी नगर चौक ह्या ठिकाणी अवैध दारू हाँटेलमध्ये खरेदी विक्री व्यवहार सुरू असून रात्री उशिरापर्यंत दारू मिळत असून पोलिस त्या ठिकाणी कारवाई करत नाही पिंपरी चिंचवड शहर राज्य उत्पादन शुल्क विभाग अधिकारी गप्प का बसले आहेत त्यांचे पिंपरी चिंचवड शहरातील कार्यक्षेत्र निष्क्रिय ठरले असून कारवाई करण्यात येवू नये म्हणून राजकीय दबावामुळे गप्प बसले आहेत का त्या संदर्भात जाहीर खुलासा करण्यात यावा निवडणूक डोळ्यासमोर आल्या असून हाँटेल धारकांना अवैध दारू खरेदी विक्री व्यवहार करण्यासाठी सुट देण्यात आली आहे का प्रत्येक हाँटेल धारकांना मासिकं २००० वीस हजार रुपये मासिक हप्ता पोलिस अधिकारी व कर्मचारी ह्यांना द्यावा लागत आहे रेल्वे पटरी शेजारी रेल्वे हद्दीत मटका जुगार धंदे व दारू खरेदी विक्री जोरात सुरू असून लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी ही विनंती सचिन काळभोर चिटणीस भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर