महामंडलेश्वर ,दि.२७ (पीसीबी) – महाकुंभमेळ्यात यावेळेस बरेच चेहरे प्रसिद्धी झोतात आलेले पाहायला मिळाली. मग कोणी शिक्षित मुलगा साधू बनलेला असो किंवा कोणी मॉर्डन साध्वी असो. यंदाचा कुंभमेळ्याची ही बाजूसुद्धा पाहायला मिळाली. अशातच एका अभिनेत्रीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि आता सर्वत्र तिचीच चर्चा आहे. ही अभिनेत्री आहे. ममता कुलकर्णी
ममता कुलकर्णीने खूप वर्षांपूर्वी भारत सोडला त्यानंर तिने अध्यात्माचा मार्ग पत्करला होता. काही दिवसांपूर्वीच भारतात आली होती. तेव्हा तिचे काही व्हिडीओ व्हायरलही झाले होते. पण आता महाकुंभामध्ये तिने येऊन सर्वांनाच आश्चर्य वाटेल अशी गोष्ट केली आहे. ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर प्रचंड चर्चा सुरु झाल्या आहेत. तर अनेकांनी तिला ट्रोल करण्यासही सुरुवात केली आहे.
दरम्यान ट्रान्सजेंडर कथावाचक जगद्गुरू हिमांगी सखी माँ यांनी देखील यावर भाष्य करत याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. हिमांगी सखी यांनी ममता कुलकर्णीच्या भूतकाळातील वादांवर मुद्दा उचलत तिच्या नियुक्तीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ANI शी संवाद साधताना त्यांनी ममता कुलकर्णीच्या नियुक्तीवर नाराजी जाहीर केली.
त्या म्हणाल्या की, “किन्नर आखाड्यात येण ममताने फक्त प्रसिद्धीसाठी केलं आहे. समाजाला तिचा भूतकाळ चांगलाच माहिती आहे. तिला ड्रग्ज प्रकरणात जेलमध्येही जावं लागलं होतं. आता अचानक ती भारतात येते, महाकुंभमध्ये सहभागी होते आणि महामंडलेश्वर पद तिला दिलं जातं. हे बरोबर नाही. याची चौकशी व्हायला हवी,” असं हिमांगी सखी माँ यांनी म्हणत नाराजी व्यक्त केली.
“जिच्या भुतकाळाबद्दल सर्वांना माहित असताना,तिला कोणतीही दिक्षा न देता अशा व्यक्तीला महामंडलेश्वर पद देऊन तुम्हाला नेमका कोणता गुरु सनातन धर्माला द्यायचा आहे? हा नैतिकतेचा प्रश्न आहे. ज्याची गुरु होण्याची लायकी नाही अशा व्यक्तीला गुरु केलं जात आहे,” असा आक्षेप नोंदवत हिमांगी सखी माँ यांनी संताप व्यक्त केला आहे.