ट्रक मधील टाइल्स अंगावर पडल्याने कामगाराचा मृत्यू

0
50

काळेवाडी, दि. 1 (पीसीबी) :

ट्रक मधून टाइल्स उतरवत असताना ट्रक चालकाने ट्रक अचानक पुढे घेतला. यामुळे ट्रक मधील टाइल्स अंगावर पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना 21 ऑक्टोबर रोजी विजय नगर काळेवाडी येथे घडली.

उदय कमलाकर महामुनी (वय 44, रा. काळेवाडी) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी उदय यांचा भाऊ जयंत कमलाकर महामुनी (वय 42) यांनी 30 नोव्हेंबर रोजी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक सोनूकुमार महेंद्र चौधरी (रा. मंचर, ता. आंबेगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उदय महामुनी हे विजयनगर काळेवाडी येथे तनिष टाइल्स या दुकानामध्ये ट्रक मधून टाइल्स उतरविण्याचे काम करीत होते. आरोपी ट्रक चालक सोनूकुमार याने अचानक ट्रक सुरू करून पुढे घेतला. त्यामुळे ट्रक मधील टाइल्स पडल्या. काही टाइल्स उदय महामुनी यांच्या अंगावर पडल्याने त्यात त्यांचा मृत्यू झाला. काळेवाडी पोलीस तपास करीत आहेत.