ट्रक चालकाकडून सहा लाखांच्या मालाचा अपहार

0
113

दि २६ मे (पीसीबी ) – खोटी नंबर प्लेट लाऊन ट्रकमध्ये भंगारचा सहा लाखांचा माल भरला. तो माल कोल्हापूर येथे पोहोच करण्यासाठी दिला असता माल पोहोच न करता त्याचा अपहार केला. याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोपान नाथू मुळे (रा. गुंजाळवाडी आर्वी, ता. जुन्नर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी भंगार व्यावसायिक सचिन सुभाष रणभुसे (वय 44, रा. मोशी. मूळ रा. कोल्हापूर) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रणभुसे यांचे मोई येथे श्री गजानन एंटरप्रायजेस हे भंगार मालाचे गोदाम आहे. गोदामातून रणभुसे यांनी आरोपीच्या ताब्यातील ट्रकमध्ये सहा लाख दोन हजार 110 रुपये किमतीचा माल कोल्हापूर येथील ट्रेड इंडिया या कंपनीत पोहोच करण्यासाठी दिला. दरम्यान, आरोपी सोपान मुळे याने खोटी नंबर प्लेट लावलेल्या ट्रक मधून हा माल मोई येथून नेला. त्यानंतर तो माल कोल्हापूर येथे पोहोच न करता त्या मालाचा अपहार केला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.