ट्रकच्या बॅटरी चोरणाऱ्या तिघांना अटक

0
300

चाकण, दि. २४ (पीसीबी) – पेट्रोल पंपावर पार्क केलेल्या ट्रकच्या दोन बॅटरी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना 17 ते 22 एप्रिल या कालावधीत नाणेकरवाडी येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपावर घडली.

संकेत संजय शेळके (वय 22, रा. मेदनकरवाडी, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीसा ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश सुनील लष्करे (वय 25), अमोल निवृत्ती चव्हाण (वय 30), बसवेश्वर कृष्णाजी भिसे (वय 23, तिघे रा. नाणेकरवाडी, चाकण) यांना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांचा ट्रक नाणेकरवाडी येथील एका पेट्रोल पंपावर पार्क केला होता. तिथून अज्ञातांनी त्यांच्या ट्रकच्या 15 हजार रुपये किमतीची दोन बॅट-या काढून चोरून नेल्या. पोलिसांनी याप्रकरणी तिन्ही चोरट्यांना अटक केली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.