ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू

0
134

ट्रकच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि.14) परंदवाडी ते सोमाटणे फाट्याकडे जाणाऱ्या मार्गावरील परंदवाडी ओव्हेरब्रिज वर घडला आहे.

याप्रकरणी शकूर मुबारक शेख (वय 36 रा तळेगाव दाभाडे) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी टाटा ट्रक के ए 27 ए 4604 यावरील चालकावर गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात रियाज अहमद मुख्तार कुरेशी (वय 44 रा. मामुर्डी) यांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाज कुरेशी हे त्यांच्या ताब्यातील दुचाकी घेऊन घरी जात असताना पाठीमागून येणाऱ्या ट्रकने वेगात येवून त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात रियाज कुरेशी खाली कोसळले व त्यांना गंभीर दुखापत झाली. यातच त्यांचा मृत्यू झाला यावरून शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.