ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
28

चाकण, दि. १५ (पीसीबी)
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. १४) मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रोडवर चाकण येथे घडला.

गोविंद पांडुरंग कदम (वय ३२, रा. राजेवाडे, ता. अंबाजोगाई, जि. बीड) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे. याप्रकरणी किशोर बबन वाळके (वय ३२, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक मनोजकुमार महादेव स्वामी (वय ५६, रा. लोणावळा, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण-शिक्रापूर रोडवर ट्रक चालक मनोजकुमार स्वामी याने त्याच्या ताब्यातील ट्रक निष्काळजीपणे चालवून समोरील एका दुचाकीला धडक दिली. त्या अपघातात दुचाकी चालक गोविंद कदम यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.