ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
195

दि ८ मे (पीसीबी ) – ट्रकच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात सोमवारी (दि.6) हिंजवडी फेज टू येथे घडला आहे.

कुणाल कौसिक डे (वय 24 रा.माण, मुळशी) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात
टाटा 1618 सी हायवा (एमएच 12 क्यूजी1213) वरील चालक महाविर जालिंदर समिंदर (वय 36 रा.देहुगाव)याच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.हिंजवडी पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई सागर घोगरे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने त्याच्या ताब्यातील हायवा डंपरे हे बेदरकारपणे चालवून डे यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यात डे हे गंभीर जखमी झाले. मात्र आरोपीने तेथे थांबून वैद्यकीय मदत न करता तेथून पसार झाला व डे यांचा या अपघातात मृत्यू झाला. यावरून हिंजवडी पोलीस ठाण्यात पिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.