ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू

0
249

नाणेकरवाडी, दि. १४ (पीसीबी) – दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला भरधाव ट्रकने धडक दिली. त्यात दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. १३) सकाळी पावणे सात वाजता पुणे नाशिक महामार्गावर नाणेकरवाडी येथे घडली.

संध्या विशाल पवार (वय ३३, रा. खंडोबा माळ,चाकण) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे. याप्रकरणी फिर्यादी यांचे पती विशाल राजेश पवार यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजित दिनेश जगदाळे (वय ३२, रा. धाराशिव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या पत्नी संध्या त्यांच्या दुचाकीवरून पुणे नाशिक महामार्गावरून जात होत्या. नाणेकरवाडी येथे आल्यानंतर त्यांच्या दुचाकी एक ट्रकने धडक दिली. त्यात संध्या या गंभीर जखमी झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.