दि.१३(पीसीबी)-भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (११ फेब्रुवारी) रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास जाधववाडी, चिखली येथे घडली.
अनिल पांडुरंग कांबळे (२५) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या अपघात प्रकरणी अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सुनिल पांडुरंग कांबळे (२९, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारा भरधाव वेगातील ट्रकने पल्सर दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात अनिल कांबळे यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.











































