ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू, चिखली कुदळवाडीतील अपघात

0
141

कुदळवाडी, दि. १३ (पीसीबी) – भरधाव ट्रकने एका व्यक्तीचा धडक दिली. त्यात गंभीर जखमी होऊन व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि. 10) सायंकाळी कुदळवाडी येथे घडला.

ओमप्रकाश सुर्यानाथ त्रिपाठी (वय 47, रा. कुदळवाडी, चिखली) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी गौरव ओमप्रकाश त्रिपाठी (वय 19) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विठ्ठल सोमनाथ हाके (वय ४८, रा. चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील ओमप्रकाश हे त्यांच्या घराजवळ असताना आरोपी हाके याने त्याच्या ताब्यातील ट्रक (एमएच 21/एक्स 1899) वेगाने व हयगयीने चालवून ओमप्रकाश यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने ओमप्रकाश यांचा मृत्यू झाला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.