दि ९ मे (पीसीबी ) – अपंग व्यक्ती आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिली. यामध्ये अपंग व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सात मे रोजी रात्री अकरा वाजताच्या सुमारास टिळक चौक निगडी येथे घडली.
किशोर वसंत शिंदे (वय 41) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी प्रभाकर बलभीम सुभेदार (वय 45, रा. चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरेंदर चगंदर भान (वय 35, रा. हरियाणा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मेहुणा किशोर शिंदे यांची टिळक चौक निगडी येथे पान टपरी आहे. पान टपरी बंद करून ते अपंग व्यक्तीसाठी बनवलेली दुचाकी घेऊन घरी जात होते. त्यावेळी पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये किशोर शिंदे हे गंभीर जखमी झाले. अपघात झाल्यानंतर घटनेची माहिती न देता तसेच शिंदे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता आरोपी ट्रक चालक पळून गेला. दरम्यान किशोर शिंदे यांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.









































