ट्रकच्या चाकाखाली येवून दुचाकीस्वाराचा मृत्यू ,ट्रक चालकाला अटक

0
456

हिंजवडी, दि. २४ (पीसीबी) – ट्रकच्या चाकाखाली येवून दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी ट्रक चालकाला अटक केली आहे.हा अपघात बुधवारी (दि.23) हिंजवडी येथील लक्ष्मी चौकात घडला आहे.

पोलिसांनी रंगनाथ रामभाऊ तांबे (वय45 रा.भिवंडी)असे अटक आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात संजय माधव वडजे (वय 28 रा.आकुर्डी)यांनी फिर्याद दिली आहे.यात रामदास वडजे (वय 27)असे मयत दुचाकी स्वाराचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भाऊ दुचाकी वरून जात असताना आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रक वेगाने चालवून दुचाकीला मागून जोरात धडक दिली.यात वडजे हे गंभीर जखमी झाले यात त्यांचा मृत्यू झाला . हिंजवडी पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.