ट्रकची दुचाकीला धडक; पती-पत्नी गंभीर जखमी

0
92

चाकण, दि.२९ (पीसीबी)

खेड तालुक्यातील चिंचोशी येथे भरधाव ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकी वरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात 30 ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडला.

रेखा आबासाहेब राव (वय 50), आबासाहेब नथू राव (वय 59, रा. वेताळे, ता. खेड) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी महेश आबासाहेब राव (वय 29) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक हनुमंत भगवान शिंदे (वय 47, रा. तुळजापूर, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची आई आणि वडील दुचाकी (एमएच 12/एएम 4166) वरून चिंचोशी गावाकडून दावडी गावाकडे जात होते. समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने (एमएच 12/क्यूडब्ल्यू 1466) आबासाहेब यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक पळून गेला. या अपघातामध्ये आबासाहेब यांच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर झाले. तर रेखा यांच्या तोंडाचे हाड फ्रॅक्चर झाले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.