ट्रकची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्य़ू

0
339

आळंदी, दि. २ (पीसीबी) – ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (दि.28) मेदनकरवाडी, आळंदी फाटा येथे घडला आहे.

यावरून ओमकार बाजीराव कुलाळ ( वय 19 रा.चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून आयशर कंपनीचा लाल रंगाचा ट्रक वरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदी फाट्याकडून आळंदीकडे जात होते यावेळी आरोपी हा त्याच्या ताब्यातील ट्रक घेवून जात होता. यावेळी त्याने नारायण होनाप्पा कोलेकर हा दुचाकीवरून जात होता. यावेळी आरोपीने ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यावेळी दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर जखम झाली आहे. यात दुचाकीस्वार मृत्यू झाला आहे. यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.