ट्रकची दुचाकीला धडक; एकजण जखमी

0
79

दि. ३१ जुलै (पीसीबी) भोसरी,
भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना सोमवारी (दि. 29) सायंकाळी चार वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर भोसरी येथे घडली.

सर्जेराव सदाशिव कोडे (वय 59, रा. बालाजीनगर, धनकवडी, पुणे) असे अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांनी मंगळवारी याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हनुमंत महादु आरसुळे (वय 23, रा. गादी पिंपळगाव, ता. परळी जि.बीड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सर्जेराव हे त्यांच्या मित्रासह (एमएच 12 व्हीई 1053) या दुचाकीवरून चालले होते. ते पुणे नाशिक महामार्गावरील बिकानेर स्वीट चौक येथे आले असता भरधाव वेगात आलेल्या एमएच 25 यू 1288) या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात. फिर्यादी सर्जेराव यांच्या उजव्या पायास फॅक्चर केले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.