ट्रकची दुचाकीला धडक

0
45

दुचाकीस्वार जखमी

महाळुंगे, दि. २७ (पीसीबी)
कुरुळी गावातील स्पायसर चौकात सिग्नल सुटल्यानंतर ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि. २६) सकाळी पावणे अकरा वाजता घडली.

जयेश अंबादास वाकचौरे (वय २६, रा. चिंबळी) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालक दत्तात्रय रामचंद्र माने (वय ३७, रा. भोसे, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जयेश हे त्यांच्या दुचाकीवरून जात होते. कुरुळी येथील स्पायसर चौकात सिग्नलवर थांबले होते. सिग्नल सुटल्यानंतर पुढे जात असताना ट्रकने जयेश यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये जेयश यांच्या कमरेला आणि मांडीला दुखापत झाली. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.