ट्रकखाली चिरडून एकाचा मृत्यू

0
40

चाकण, दि. 12 (पीसीबी) : ट्रक चालकाने निष्काळजीपणे ट्रक चालवला. त्यामुळे ट्रक खाली चिरडून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीची ओळख पटली नाही. हा अपघात बुधवारी (दि. ११) दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास मार्केट यार्ड, चाकण येथे घडला.

जयकुमार संतोष राजपूत (वय २७, रा. चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार महादेव बाबासाहेब ढाकणे (वय ३७, रा. अहिल्यानगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ढाकणे याने त्याच्या ताब्यातील ट्रक (एमएच १२/टीव्ही ६३७८) हायगयीने चालवला. चाकण मार्केट यार्ड येथे ट्रकच्या समोरील बाजूला कोणी आहे का, हे न पाहता त्याने ट्रक पुढे घेतला. त्यामध्ये ट्रक समोर असलेल्या सुमारे ३६ वर्ष वयाच्या अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.