टोईंग कर्मचाऱ्याकडून दुचाकीस्वाराला हेल्मेटने मारहाण

0
4

नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी टोईंग करण्याच्या कारणावरून झालेल्या वादात वाहने टो करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने एका तरुणाला हेल्मेटने मारून जखमी केले. ही घटना शनिवारी (२४ जानेवारी) सायंकाळी वाकड येथे घडली.

याबाबत तेजस भाऊसाहेब आहेर (३१, वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राधीकेश पवार (२७, कात्रज, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली असता, आरोपी राधीकेश पवार याने ती गाडी टोईंग केली. फिर्यादी दंड भरण्यास तयार असतानाही आरोपीने त्यांना आणि त्यांच्या पत्नीला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात हेल्मेट मारून त्यांना जखमी केले, तसेच त्यांच्या पत्नीचा मोबाईल फोन रस्त्यावर फेकून फोडून नुकसान केले. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.