टेम्पोला मिक्सरची धडक, मिक्सर गाडी चालकाचा मृत्यू

0
260

टेम्पोला पाठीमागून मिक्सरने जोरदार धडक दिली आहे. या अपघातात मिक्सर चालकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.13) मुंबई-बँगलोर महामार्गावर मामुर्डी येथे घडला आहे.

याप्रकरणी गाडीचा क्लिनर अखिलेश कुमार साकेत (वय 25 रा. आंबी, मावळ) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून सुरेश प्रकाश चर्मकार (वय 38 रा. मध्यप्रदेश ) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे, या अपघातात सुरेश चर्मकार याचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार. आरोपी याने त्याच्या ताब्यातील मिक्सर गाडी भरधाव वेगाने चालवून पुढे जाणाऱ्या टेम्पोला धडक दिली. यात मिक्सर चालक सुरेश चर्मकार याचा मृत्यू झाला आहे. यावरून देहुरोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.