टेम्पोच्या धडकेत 12 वर्षीय मुलाचा मृत्यू; वडील गंभीर जखमी

0
455

रासे फाटा, दि. ६ (पीसीबी) – भरधाव जाणाऱ्या टेम्पोने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर मुलाचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी (दि. 4) दुपारी सव्वा दोन वाजता रासे फाटा येथे घडला.

श्रीमंत भीमा धनवे (वय 39, रा. शिक्रापूर, ता. शिरूर) असे गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या 12 वर्षीय मुलाचा अपघातात मृत्यू झाला आहे. श्रीमंत धनवे यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंडू सुदाम धायबर (वय 46, रा. शिक्रापूर, ता. शिरूर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बंडू धायबर याने त्याच्या ताब्यातील आयशर टेम्पो (एमएच 16/सीडी 0962) बेदरकारपणे चालवला. शिक्रापूर चाकण रोडने जात असताना रासे फाटा येथे आल्यानंतर धायबर याने त्याच्या ताब्यातील टेम्पोने धनवे यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. धनवे आणि त्यांचा मुलगा दुचाकीवरून जात होते. टेम्पोच्या धडकेत दोघेही खाली पडले. यामध्ये मुलाचा मृत्यू झाला असून धनवे हे गंभीर जखमी झाले आहेत. चाकण पोलीस तपास करीत आहेत.