टेम्पोच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

0
84

चाकण, दि. 11 ऑगस्ट (पीसीबी) -भरधाव जाणाऱ्या टेम्पोने पादचारी वृद्धाला धडक दिली. यामध्ये वृद्धाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 9) सकाळी पावणेआठ वाजताच्या सुमारास चाकण मधील माणिक चौकात घडला.

रोहिदास बबन केदारी (वय 59, रा. वाकी, ता. खेड) असे मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी अक्षय रोहिदास केदारी (वय 25) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाळासाहेब बाजीराव लामखेडे (वय 39, रा. केळवाडी, ता. संगमनेर, अहमदनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील रोहिदास केदारी हे चाकण मधील माणिक चौक येथे पायी रस्ता ओलांडत होते. त्यावेळी शिक्रापूर कडून चाकणच्या दिशेने येणाऱ्या आयशर टेम्पोने त्यांना धडक दिली. यामध्ये रोहिदास केदारी यांच्या छातीला, पायाला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.