१९ जुलै (पीसीबी) हिंजवडी,
रस्ता ओलांडणाऱ्या महिलेला भरधाव टेम्पोने धडक दिली. त्यामध्ये पादचारी महिलेचा दात पडला. ही घटना 16 जुलै रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास मारुंजी येथे घडली.
याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो (एमएच 14/केए 1408) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला 16 जुलै रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास मारुंजी येथे रस्ता ओलांडत होत्या. त्यावेळी भरधाव आलेल्या टेम्पोने त्यांना धडक दिली. त्यात फिर्यादी यांचा एक दात पडला. अपघात झाल्यानंतर टेम्पो चालक पळून गेला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.










































