टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार महिला जखमी

0
60

वाकड, दि. 22 (पीसीबी) : तीन चाकी टेम्पोने एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार महिला जखमी झाली आहे. हा अपघात सोमवारी (दि. 21) सकाळी बारा वाजताच्या सुमारास एमएम चौक, काळेवाडी येथे घडला.

याप्रकरणी जखमी 37 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तीन चाकी टेम्पो वरील अनोळखी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या दुचाकीवरून मुलाला शाळेत सोडण्यासाठी रहाटणी येथून चिंचवडगाव येथे जात होत्या. एमएम चौक काळेवाडी येथील बुद्ध विहारासमोर आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला पाठीमागून तीन चाकी टेम्पोने धडक दिली. त्यामध्ये फिर्यादी महिला जखमी झाल्या आहेत. अपघात झाल्यानंतर महिलेला कोणतीही वैद्यकीय मदत न पुरवता आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.