टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
107

महाळुंगे,दि. १९ (पीसीबी)

टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.16) रात्री महाळुंंगे येथे घडला.

उमाकांत वीरेंद्रप्रसाद यादव (वय 27) असे मयत तरुणाचे नाव आहे. यावरून अमीत रामप्रकाश बघेल (वय 27, रा. खेड) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालक बापू बाजीराव साळुंके (वय 33, रा. संभाजीनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील टेम्पो बेदरकारपणे चालवून यादव यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात यादव खाली पडले व त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. यात गंभीर जखमी झाल्याने यादव यांचा मृत्यू झाला. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.