टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील बहिण – भाऊ जखमी

0
150

भरधाव तीन चाकी टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील मावस बहिण – भाऊ गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि. ७) दुपारी मुंबई – बंगळूरु महामार्गावर घडली.

मानसी प्रवीण काळे (वय २४, रा. वडाची वाडी रोड, उंड्री) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तीन चाकी टेम्पोचालक सुनीलकुमार पणिलाल रावत (वय ३३, रा. हिंजवडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व त्यांचा मावस भाऊ सुयश समीर नाईक (वय २३) हे त्यांच्या दुचाकीवरून पाषाण येथून हिंजवडीकडे येत होते. मुंबई – बंगळुरू महामार्गावर आले असता भरधाव तीन चाकी टेम्पोने फिर्यादी यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांच्या तोंडाला तर त्यांचे भाऊ सुयश यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुचाकीचेही नुकसान झाले. महिला सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.