चिखली, दि. 29 (पीसीबी) : भरधाव टेम्पोने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकी वरील पती-पत्नी रस्त्यावर पडले. त्यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला. तर पती गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात मंगळवारी (दि. 27) रात्री नऊ वाजताच्या सुमारास शरदनगर, चिखली येथे घडला.
सुरेखा विनोद जाधव असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे. विनोद जाधव असे जखमी पतीचे नाव आहे. याप्रकरणी अशोक लक्ष्मण कामठे (वय 32, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार टेम्पो चालक भागवत अर्जुन सलगर (वय 60, रा. अजंठानगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे मेहुणे विनोद जाधव आणि बहिण सुरेखा जाधव हे दुचाकीवरून जात होते. शरदनगर चिखली येथील स्वामी विवेकानंद ग्रेड सेपरेटर जवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला भरधाव जाणाऱ्या एका टेम्पोने धडक दिली. त्यामध्ये दोघेही रस्त्यावर पडले गंभीर जखमी झालेल्या सुरेखा यांचा मृत्यू झाला. तर विनोद जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. चिखली पोलीस तपास करीत आहेत.










































