टीसीएस 12,000 कर्मचारी काढणार

0
14

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस (TCS) ही भारतातली सर्वात मोठी IT सेवा क्षेत्रातली कंपनी आहे. पाच लाखांपेक्षा अधिक कर्मचारी असणाऱ्या या कंपनीने 2% म्हणजे जवळपास 12,000 कर्मचारी कमी करणार असल्याचं जाहीर केलंय. यामध्ये मध्यम आणि वरिष्ठ पातळीवरचे कर्मचारी असतील. आतापर्यंत अनेकांसाठी Dream Job देणाऱ्या IT क्षेत्रात नेमकं काय सुरू आहे.
एआय मुळे अनेक आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत आहेत. इन्फोसिस, विप्रो सारख्या बड्या कंपन्यांपाठोपाठ आता टीसीएस मध्ये वेगाने कर्मचारी कपात सुरू झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.