टीम इंडियाचा बांग्लादेशवर 5 धावांनी विजय

0
272

विदेश,दि.०२(पीसीबी) – अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली आहे. टीम इंडियाने बांग्लादेशवर 5 धावांनी विजय मिळवला. सेमीफायनलमध्ये प्रवेशासाठी टीम इंडियाला आज विजय आवश्यक होता. या विजयामुळे टीम इंडियाचा पुढचा मार्ग सुकर झालाय. आजच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. त्यामुळे सामना 20 ऐवजी 16 षटकांचा करण्यात आला.

बांग्लादेशचा कॅप्टन शाकीब अल हसनने टॉस जिंकून टीम इंडियाला पहिली बॅटिंग दिली. टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 6 विकेट गमावून 184 धावा केल्या होत्या. बांग्लादेशला विजयासाठी 185 धावांची गरज होती. पण या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला.

त्यामुळे सामना 20 ऐवजी 16 षटकांचा करण्यात आला. बांग्लादेशला विजयासाठी 16 षटकात 151 धावांच टार्गेट देण्यात आलं. त्यावेळी त्यांना 9 ओव्हर्समध्ये 85 धावांची गरज होती. बांग्लादेशचा एकही विकेट गेला नव्हता.