टीआरएफच्या दहशतवादी कारवायांमागे सैफुल्लाह खालिदच डोकं

0
3

दि . २३ ( पीसीबी ) – जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील बैसारन घाटीत झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सगळ्या देशाला हलवून सोडलय. या हल्ल्यात आतापर्यंत 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. अनेक पर्यटक गंभीररित्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफ म्हणजे ‘द रेजिस्टेंस फ्रंटने’ घेतली आहे. टीआरएफ हा पाकिस्तान स्थित लश्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा चेहरा आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील लष्कर आणि टीआरएफच्या दहशतवादी कारवायांमागे दहशतवादी सैफुल्लाह खालिदच डोकं आहे. तो या हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे.

लश्कर-ए-तैयबाचा डेप्युटी चीफ सैफुल्लाह खालिद सैफुल्लाह कसुरीच्या नावाने सुद्धा ओळखला जातो. भारताचा सर्वात मोठा शत्रू हाफीज सईदचा तो निकटवर्तीय आहे. या हाफीज सईदने भारतात अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले आहेत. सैफुल्लाह खालिद आलिशायन गाड्यांचा शौक आहे. अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेले दहशतवादी त्याच्या सुरक्षेसाठी तैनात असतात. पाकिस्तानी सैन्यातही त्याचं वजन आहे. हा पाकिस्तानी सैनिकांना नेहमी भडकवण्याच काम करत असतो.

त्याच्यावर फुलांचा वर्षाव
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दोन दिवस आधी सैफुल्लाह खालिद पाकिस्तानच्या पंजाबमधील कंगनपुर येथे आला होता. तिथे पाकिस्तानी सैन्याची एक मोठी बटालियन राहते. तिथे पाकिस्तानी सैन्याचा एक कर्नल जाहिद जरीन खटकने त्याला जिहादी भाषण देण्यासाठी बोलावलं होतं. तिथे सैफुल्लाह आल्यानंतर पाकिस्तानी कर्नलने त्याच्यावर फुलांचा वर्षाव केला. त्यानंतर त्याने पाकिस्तानी सैन्याला भारताविरोधात भरपूर भडकावलं. भारतीय सैनिकांची जितकी हत्या कराल, तितका अल्लाह तुम्हाला फळ देईल इथपर्यंत सैफुल्लाह खालिद बोलून गेला.

‘2 फेब्रुवारी 2026 पर्यंत काश्मीर स्वतंत्र होईल’
अशाच प्रकारे खैबर पख्तूनख्वा येथे आयोजित एका सभेत त्याने भारताविरोधात गरळ ओकली होती. “मी शब्द देतो आज 2 फेब्रुवारी 2025 आहे, 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत काश्मीर ताब्यात घेण्याचा पूर्ण प्रयत्न करु. येणाऱ्या दिवसात आमचे मुजाहिदीन हल्ले तीव्र करतील. 2 फेब्रुवारी 2026 पर्यंत काश्मीर स्वतंत्र होईल अशी अपेक्षा त्याने व्यक्त केलेली” आयएसआय आणि पाकिस्तानी सैन्याने मिळून या सभेच आयोजन केलं होतं. त्याला ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने दहशतवादी जमले होते.

सैफुल्लाह कसुरी सुद्धा हजर होता
एका इंटेलिजेंस रिपोर्टनुसार, मागच्यावर्षी शेकडो पाकिस्तानी दहशतवादी एबोटाबादच्या जंगलात आयोजित दहशतवादी शिबिरात सहभागी झाले होते. हे शिबीर लश्कर-ए-तैयबाची पॉलिटिकल शाखा पीएमएमएल आणि एसएमएलने आयोजित केलं होतं. याला सैफुल्लाह कसुरी सुद्धा हजर होता. त्याने या शिबीरातून दहशतवादी हल्ल्यासाठी अतिरेक्यांची निवड केली होती.