टिपटॉप हॉटेलच्या पार्किंग मधून इनोव्हा कार चोरीला

0
400

हिंजवडी, दि. १७ (पीसीबी) – हिंजवडी येथील टिपटॉप हॉटेलच्या पार्किंग मधून अज्ञातांनी इनोव्हा कार चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. १५) सकाळी सात ते रात्री साडे अकरा वाजताच्या कालावधीत घडली.

आदित्य राजेंद्र मोहिते (वय ३२, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहिते यांनी त्यांची २२ लाख रुपये किमतीची इनोव्हा क्रिस्टा कार (एमएच १०/डीटी १२१२) हिंजवडी येथील टिपटॉप हॉटेल येथे शुक्रवारी सकाळी सात वाजता पार्क केली. त्यानंतर ते तिथून मित्राच्या कारमधून मुंबईला गेले. रात्री साडे अकरा वाजता ते मुंबईहून परत आले. त्यावेळी त्यांची कार हॉटेलच्या पार्किंग मध्ये नव्हती. दिवसभराच्या कालावधीत अज्ञाताने त्यांची कार चोरून नेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.