टास्क व क्रिप्टो करंसी च्या बहाण्याने नागरिकाची 33 लाखाची फसवणूक

0
422

पिंपळे सौदागर, दि. ८ (पीसीबी) – स्टार स्पोर्ट क्रिकेट करन्सीचा बहाना करत एका 52 वर्षे नागरिकाची 33 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक ऑनलाईन पद्धतीने 26 ते 27 ऑगस्ट 2023 या कालावधीत पिंपळे सौदागर येथे घडली आहे.

याप्रकरणी पिंपळे सौदागर येथील 52 वर्षीय नागरिकांनी सांगवी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.7)फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी याप्रकरणी एका अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना ग्लोबल इंडिया कंपनीच्या वतीने ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले. त्या मार्फत काही टास्क पूर्ण करण्यासही सांगितले टास्कचे फिर्यादी यांना पैसे मिळाले त्यानंतर आरोपीने क्रिप्टो करन्सी बाबत माहिती देऊन फिर्यादी यांना पैसे गुंतवण्यास सांगितले. फिर्यादी यांचा विश्वास संपादन केल्यानंतर फिर्यादी यांनी 33 लाख रुपये गुंतवले. ज्याचा त्यांना 60 लाख रुपये परतावा मिळणार होता. मात्र ही रक्कम मागितल्यास त्यांना टॅक्स ड्युटी भरली नाही तर परतावा मिळणार नाही असे सांगण्यात आले. यावरून फिर्यादी यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. या संपूर्ण प्रकरणात फिर्यादी यांची 33 लाख 2 हजार 440 रुपयांची फसवणूक झाली आहे.त्यानुसार सांगवी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.