टास्कच्या भाड्याने महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक

0
354

भोसरी, दि. ५ (पीसीबी) -टास्क पूर्ण केल्यास तात्काळ आकर्षक पैसे मिळतील असे आम्ही दाखवून एका महिलेची तीन लाख 64 हजार पाचशे रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 20 ऑगस्ट ते चार सप्टेंबर या कालावधीत भोसरी परिसरात घडली.

याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार 8001839560 क्रमांक धारक तसेच टेलिग्राम आयडी धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना सोशल मीडियावरून संपर्क करत त्यांना फसव्या वेब पेजच्या माध्यमातून टास्क पूर्ण केल्यानंतर तात्काळ आकर्षक पैसे मिळतील असे आमिष दाखवले. त्यातून फिर्यादी यांच्याकडूनच तीन लाख 64 हजार 500 रुपये घेत त्यांना कोणताही परतावा तसेच गुंतवलेली मूळ रक्कम न देता त्यांची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.