टास्कच्या बहाण्याने 40 लाखांची फसवणूक

0
86

वाकड, दि. 29 (पीसीबी) : हॉटेलचे रिझर्वेशन करण्याचा टास्क देऊन वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे घेते एका व्यक्तीची 40 लाख 54 हजार 72 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार ऑगस्ट 2023 ते 7 ऑक्टोबर 2023 या कालावधीत काळेवाडी येथे घडला.


याप्रकरणी 36 वर्षीय व्यक्तीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीस टेलिग्राम अकाउंट वरून पार्ट टाइम जॉबची जाहिरात दाखवण्यात आली. ती जाहिरात पाहून त्यामध्ये फिर्यादी यांनी रस दाखविला असता अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीस हॉटेलचे रिझर्वेशन करण्याचा टास्क दिला. तसेच वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये एकूण 40 लाख 54 हजार 72 रुपये भरण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.