टास्कच्या बहाण्याने महिलेची 25 लाख 71 हजार रुपयांची फसवणूक

0
231

मुळशी, दि. २७ (पीसीबी): टास्कच्या बहाण्याने एका महिलेची 25 लाख 71 हजार रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार दहा ते 24 डिसेंबर या कालावधीत मुळशी तालुक्यातील बावधन येथे घडला.

याप्रकरणी महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 8807994418190 या क्रमांकावरून बोलणारा अज्ञात इसम, तसेच टेलिग्राम चॅनल धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना आरोपींनी व्हाट्सअप वर मेसेज केले. टास्क पूर्ण करण्याची माहिती देत टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला मिळेल असे आमिष दाखवण्यात आले. त्यानुसार फिर्यादी यांना टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यास भाग पाडले. दरम्यान आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून टास्कच्या बहाण्याने वेळोवेळी 25 लाख 71 हजार 270 रुपये घेतले आणि ते पैसे परत न करता तसेच मोबदला न देता त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.