टास्कच्या नावाखाली 90 लाखांची फसवणूक

0
133

टास्‍कच्या नावाखाली एका ज्येष्ठ नागरिकाची 89 लाख 61 हजार 189 रुपयांची फसवणूक केली. ही घटना पिंपरी येथे 14 मार्च रोजी घडली.

याप्रकरणी 62 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने शुक्रवारी (दि. ७) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी ५३ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्याशी व्हाट्सअप व टेलिग्रामद्वारे मेसेज पाठविला. त्‍यांना टेलिग्राममधील ग्रुपमध्ये सहभागी होण्यास सांगितले. त्यानंतर वेबसाईटवर जाऊन उत्पादनावर क्लिक करून त्याचा स्क्रीन शॉट पाठवून नफा मिळवण्याचे टास्‍क दिले. तसेच प्रॉपर्टी एक्सप्लोर करण्यासाठी टास्‍क पूर्ण करून लक्झरी एक्सप्लेयर करण्यासाठी गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यासाठी ज्यादा नफ्याचे आमिष दाखविले. बिटकॉइन ट्रेडिंगसाठी अधिक नफ्याचे अमिष दाखवून फिर्यादी यांनी गुंतवणूक केलेली व रक्कम व त्यावरील नफा विड्रॉल करतेवेळी क्रेडिट स्कोर कमी झाले आहे. व्हीआयपी मेंबरशिप अपडेट करण्यासाठी लीगल चार्जेस व मॅन्युअल विड्रॉल हॅन्डलिंग फी अशी वेगवेगळे कारणे देत फिर्यादी यांच्या बँक खात्यातून 89 लाख 61 हजार 189 रुपये घेऊन आर्थिक फसवणूक केली.