टास्‍कच्‍या नावाखाली 24 लाखांची फसवणूक

0
144

दि. २३ जुलै (पीसीबी) सांगवी,
वेलफेअर टास्‍कच्‍या नावाखाली एका तरुणाची 24 लाख 8 हजारांची फसवणूक करण्‍यात आली. ही घटना ऑनलाइन पद्धतीने पिंपळे सौदागर येथे घडली.

याबाबत 35 वर्षीय तरुणाने सोमवारी (दि. 22) सांगवी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अनोळखी मायरा (व्हॉटस अॅप नंबर 9005844325), अंजली गुप्ता (टेलिग्राम आयडी @Anjali 764159), सागर (टेलिग्राम आयडी @Saga009974), माणिक (टेलिग्राम आयडी @Manik 9527), सुहाना (टेलिग्राम आयडी @Suhara 4242), Global India-https://globalindia- 199.pagel.dev/ लिंक धारक, अॅप धारक, https://t.me/+GoR1cFx-M1MmREED धारक, टेलिग्राम गृप -00062-Google Global Working Group धारक आणि बैंक अकाऊंट धारक यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी तरुण याला गुगल रिव्‍हीव्‍ह टास्क देऊन ते पूर्ण केल्यानंतर 52 हजार 250 रुपये फिर्यादी यांच्‍या बँक खात्‍यावर जमा करुन फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला. त्‍यानंतर टेलीग्राम आयडीवर वेलफेअर टास्कसाठी 24 लाख 8 हजार रुपये गुंतवणुक करण्यास भाग पाडले. गुंतवणूक केलेली रक्कम फिर्यादी यांना परत न करता आर्थिक फसवणुक केली. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.