टाटा मोटर्स कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष शिवाजी शेडगे यांचे निधन

0
91

पिंपरी, दि. ७ (पीसीबी)- टाटा मोटर्स कामगार संघटनेचे माजी अध्यक्ष, भाजप नेते व उद्योजक शिवाजी बबनराव शेडगे (वय 69) यांचे आज बुधवारी (दि.7) पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.त्यांच्या मागे पत्नी एक मुलगा व एक मुलगी, सुन,नातवंडे असा परिवार आहे. भाजपचे जेष्ठ नेते पै. ज्ञानेश्वर शेडगे हे थोरले भाऊ आणि माजी नगरसेवक पुतणे मोरेश्वर शेडगे आणि एक बहिण असा मोठा परिवार आहे.

अंत्यविधी आज दुपारी 12 वाजता काळेवाडी स्मशान भूमी, काळेवाडी या ठिकाणी होणार असल्याचे शेडगे परिवाराने कळविले आहे.