टाटा मोटर्सच्या प्लांटमध्ये कामकाज सुरूच, कामगारांमध्ये शोकभावना

0
71

पिंपरी, दि. १० – रतन टाटा यांनी वयाच्या ८६ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालायात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्यांचा मृत्यूसोबत सुरु असलेला लढा काल रात्री अयशस्वी ठरला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगविश्वात शोककळा पसरली आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासहित उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे. टाटा यांच्या निधनानंतर अनेक राज्यांमध्ये राजकीय शोक जाहीर करण्यात आला आहे. मात्र आजही टाटा मोटर्स कंपनीत काम सुरू ठेवण्यात आलं आहे.

टाटा उद्योग समुहातील कंपन्यांतील कामगारांनी आपल्या भावना व्यक्त करत काम आजही सुरु ठेवण्यामागचे कारण सांगितले. हजारो कर्मचारी काम करत असलेल्या पुण्यातील टाटा मोटर्सच्या प्लांटमध्ये टाटांचे निधन झाल्यानंतरही काम बंद ठेवण्यात आलेलं नाही. मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा. देशाचं, कामगारांचं नुकसान व्हायला नको असं स्वतः रतन टाटा यांनी कामगारांनी सांगितलं होतं. रतन टाटा यांच्या याच आज्ञेचे पालन करत आज टाटा उद्योग समुहाच्या पुण्यातील कंपनीचे काम सुरु ठेवण्यात आलं आहे.

पिंपरी चिंचवड शहरातल्या टाटा मोटर्स प्लांटमधील कामगारांनी रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी केली आहे. रतन टाटा यांनी पिंपरी चिंचवडमधल्या टाटा मोटर्स प्लांटमध्येच निवृत्तीची घोषित केली होती. टाटा प्लांटमधील कर्मचाऱ्यांनी रतन टाटांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. टाटा मोटर्सच्या पिंपरी चिंचवड इथे रतन टाटा नेहमी यायचे, इथल्या प्रत्येक कामगाराला ते भेटायचे त्यांच्याशी बोलायचे. आज रतन टाटा यांच्या निधनाने हे कामागर पोरके झाल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहेत.

हेदेखील वाचा- Ratan tata death live updates: टाटा समूहात महत्त्वाची भूमिका बजावणारे लेआ, माया आणि नेव्हिल आहेत तरी कोण?

यावेळी बोलताना कामगार म्हणाले की, आमच्यासाठी हा खूप दु:खद दिवस आहे. या दिवसाचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. टाटा मोटर्सचे अनेक प्लांट आहेत, मात्र पुण्याच्या ठिकाणाची एक वेगळी ओळख होती. रतन टाटा जेव्हा इथे यायचे, तेव्हा ते पहिल्यांदा आपली इच्छा व्यक्त करायचे. ते युनियनचा खूप आदर करत होते. त्यांनी त्यांच्या निवृत्तीची घोषणा इथेच केली, आम्ही त्यांचा वारसा सुरू ठेवू इच्छितो, त्यांचे कर्मचारी त्यांनी कोविडच्या काळात जे केले ते आम्ही कधीही विसरू शकत नाही. कठीण काळात कशाप्रकारे पुढे जायचे हे आम्हाला रतन टाटा यांनी शिकवलं आहे.

कर्मचाऱ्यांनी पुढे सांगितलं की, रतन टाटा यांच्या निधनाने आमचा आधार हरवला आहे. रतन टाटा जेव्हा प्लांटमध्ये यायचे तेव्हा इथला प्रत्येक कर्मचारी त्यांनी भेटण्यासाठी उत्सुक असायचा. आपल्या घरातील व्यक्तिला भेटावं, अशा भावनेने रतन टाटा त्यांच्या प्रत्येक कामगारासोबत संवाद साधत होते. प्रत्येक प्रमुख व्यक्तिला रतन टाटा यांनी आमची ओळख करून दिली होती. त्यांचे हे युनियन त्यांची ताकद होती. रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगक्षेत्राचं मोठं नुकसान झालं आहे. रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी आमची मागणी आहे. सरकारने आमची मागणी पूर्ण करावी