देश, दि. १५ जुलै (पीसीबी) – काही दिवसांपूर्वी रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल या टेलकॉम कंपन्यांनी आपल्या इंटरनेटच्या दरात वाढ केली आहे. टेलकॉम कंपन्यांच्या या निर्णयाचा सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. या तिन्ही कंपन्यांनी इंटरनेट प्लॅन्स वाढवले आहेत. यामुळे ग्राहक मोठ्या प्रमाणात आपले सीमकार्ड बीएसएनएल या सरकारी टेलकॉम कंपनीमध्ये पोर्ट करून घेत आहेत. सोशल मीडियावर देखील हा मुद्दा खूप गाजत आहे. आपले कार्ड बीएसएनएलवर पोर्ट करा, असा ट्रेंडच सोशल मीडियावर (TATA and BSNL Deal ) सुरू झाला.
अशात एक मोठी बातमी समोर आली आहे. टाटा आणि बीएसएनएल यांच्यात एक मोठा करार झाल्याची माहिती समोर आली आहे. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिर्स आणि बीएसएनएल यांच्यात 15 हजार कोटी रुपयांचा एक करार झाल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, टीसीएस आणि बीएसएनएल या दोन कंपन्या मिळून 4G इंटरनेट सर्व्हिस 1000 गावांपर्यंत घेऊन जाणार आहेत. यामुळे या 1000 गावात इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. सध्या देशात जिओ, एअरटेल आणि आयडिया-व्होडाफोन या कंपन्या 5 जी आणि 4 जी इंटरनेट सेवा देण्यात आघाडीवर आहेत. टाटा आणि बीएसएनएल (TATA and BSNL Deal ) यांच्यात झालेल्या करारामुळे बीएसएनल 4 जी इंटरनेट सेवा क्षेत्रात आणखी मजबूत होऊ शकते.
जिओ-एअरटेलच्या रिचार्जमध्ये वाढ
टाटाकडून देशात चार भागांत डेटा सेंटर उभारले जात आहे. या डेटा (TATA and BSNL Deal )सेंटरच्या माध्यमातून 4 जी सेवा आणखी मजबूत केली जाणार आहे. BSNL कडून देशभरात 9000 पेक्षा अधिक 4G नेटवर्क लावण्यात आले आहेत. टाटा आणि बीएसएनएल यांच्यातील करार हा जिओ आणि एअरटलेसारख्या कंपन्यांचं टेन्शन वाढू शकतं, अशी चर्चा आहे.
दरम्यान, जिओ या टेलकॉम कंपनीने जून महिन्यात आपल्या डेटा प्लॅनमध्ये वाढ केली आहे. तसेच, व्होडाफोन आयडिया या कंपन्यांनीदेखील आपल्या रिचार्जमध्ये वाढ केली आहे. जिओने आपल्या डेटा प्लॅनमध्ये सर्वाधिक वाढ केली आहे. ही वाढ साधारण 12 ते 25 टक्के आहे. तर एअरटेलने वाढवलेला हा दर 11 ते 21 टक्के आहे.