टपली मारल्‍याचा जाब विचारल्‍याने दोघांना दगडाने मारहाण

0
47

भोसरी, दि. 06 (पीसीबी) : टपली का मारली याचा जाब विचारल्‍याने तीन जणांनी एका तरुणाला दगडाने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. ५) रात्री पावणे एक वाजताच्‍या सुमारास धावडे वस्‍ती, भोसरी येथे घडली. समीर शगीर शेख (वय २२, रा. धावडेवस्ती, भोसरी) असे मारहाणीत जखमी झालेल्‍या तरुणाचे नाव असून त्‍यांनी याबाबत भोसरी पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील संकेत संतोष पवळे (वय २१), मंगेश अशोक पटेकर (वय २३) आणि अनिकेत संतोष पवळे (वय १८, तिघेही रा. धावडेवस्ती, भोसरी) यांच्‍या विरोधात गुन्‍हा दाखल केला असून पोलिसांनी त्‍यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गुरुवारी मध्‍यरात्री पावणे एक वाजताच्‍या सुमारास धावडे वस्‍ती, भोसरी येथे (एमएच २३ बीके ४१५४) या दुचाकीवरून तिघेजण आले. त्‍यापैकी दुचाकी चालविणार्‍या आरोपीने फिर्यादी यांचा मित्र अलीम सलीम शाहा याच्‍या डोक्यात टपली मारली. त्‍यानंतर त्‍याने त्यांची दुचाकी फिर्यादी यांच्‍या समोर उभी केली. फिर्यादीचा मित्र अलीम याने डोक्यात टपली का मारली? याचा जाब विचारला. या कारणावरून संतापलेल्‍या आरोपींनी फिर्यादी व त्‍यांच्‍या दोन मित्रांना शिवीगाळ, दमदाटी करीत लाथा बुक्यांनी मारहाण केली. फिर्यादी समीर शेख यांच्‍या डोक्यात पाठी मागील बाजूस दगड मारुन जखमी केले. फिर्यादी समीर शेख याचा मित्र अलीम व सुफियान हे दोघेजण तेथून आरोपींच्‍या तावडीतून पळून जात असताना मित्र आलीम यास नमुद आरोपी यांनी पकडून तेथे पडलेला दगड उचलून त्याच्‍या डोक्यात मारुन त्यास गंभीर जखमी करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.