टँकर खाली चिरडून तरुणाचा मृत्यू

0
216

चाकण, दि. २० (पीसीबी) – टँकर दुचाकीला ओव्हरटेक करत असताना दुचाकीला टँकरचा धक्का लागला. त्यात दुचाकीस्वार टँकरखाली चिरडला गेला. ही घटना बुधवारी (दि. १९) सकाळी साडेसहा वाजता पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे घडली.

हृतिक महादेव घुले (वय १९) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी अलकेश नारायण तेलगुडे (वय १९, रा. बालाजीनगर, चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी जयवंत तुकाराम रुपनवर (वय ५१, रा. मेदनकरवाडी, ता. खेड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मित्र हृतिक घुले पुणे-नाशिक महामार्गावरून दुचाकीवरून जात होता. त्यावेळी त्याच्या पाठीमागून आलेल्या टँकरने दुचाकीला ओव्हरटेक करत असताना दुचाकीला धक्का दिला. त्यात हृतिक हा रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्यावरून टँकरचे चाक गेले. त्यात गंभीर जखमी झाल्याने हृतिकचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.