टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

0
15

चाकण,दि. 17 (पीसीबी)
टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात मेदनकरवाडी फाटा येथे सोमवारी (दि. १६) दुपारी घडला.

विद्यालाल सोमारी पाटील (वय ३८, रा. नाणेकरवाडी, चाकण) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी संतोष सोमारी पाटील (वय ४४) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार परमेश्वर बबन जाधव (रा. कडाचीवाडी, चाकण) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा भाऊ विद्यालाल पाटील हे त्यांच्या दुचाकी (एमएच १४/डीएस ८३५८) वरून कडाचीवाडी येथून चाकणकडे जात होते. मेदनकरवाडी कमानी समोर आल्यानंतर आरोपी परमेश्वर जाधव याने त्याच्या ताब्यातील टँकरने (एमएच १४/डीएम ८२८३) पाटील यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. चाकण पोलीस तपास करीत आहेत.