टँकरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

0
244

दि ३० एप्रिल (पीसीबी ) – दुचाकीवरून रस्त्यावर पडल्यानंतर टँकरखाली सापडल्याने चिरडून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २९) दुपारी म्हाळुंगे-नांदे रोडवर घडली.

वसीम आकरम (वय २२) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मोहम्मद लतीफ समीरुल(वय २१, रा. मांजरी, पुणे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचा मामाचा मुलगा वसीम हे दोघे सोमवारी दुपारी दुचाकीवरण जात होते. म्हाळुंगे-नांदे रोडने जाताना समोरील पीएमपी बसने वेग कमी केला. त्यामुळे फिर्यादी यांनी देखील त्यांचा दुचाकीचा वेग कमी केला. त्यावेळी वसीम हा दुचाकीवरून खाली पडला. समोरून येणाऱ्या टँकरखाली तो चिरडला गेला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.