झोपडपट्टी भागातील बालकांचा गौरव

0
229

झोपडपट्टी भागातील बालकांचा गौरवपोलीस रेझिंग डेनिमित्त दिशा पिंपरी चिंचवड पोलिसांचा उपक्रम

निगडी, दि. ७ (पीसीबी) – पोलीस रेझिंग डे निमीत्त पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने निगडी पोलीस स्टेशन येथे दिशा या सामाजीक उपक्रमांतर्गत शुक्रवारी (दि. 6) झोपडपट्टी भागातील बालकांचा गौरव करण्यात आला. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या “दिशा” याउपक्रमांतर्गत सर्व पोलीस ठाण्याच्या झोपडपट्टी भागामध्ये स्थापन करण्यात आलेल्या महिला/गृहिणी समिती, बालकल्याण सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्ते प्रतिनिधी, पोलीस ठाणे स्तरावर नेमण्यात आलेले समन्वयक पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत दिशा भरकटलेल्या बालकांचा व सामाजिक संस्थांचा गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमास 200 हुन अधिक महिला व सामाजिक कार्यकर्ते समन्वयक व पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दिशा उपक्रम सुरु केल्यामुळे कसा सकारात्मक बदल झाला याबाबत शाळाबाहय मुले वव्यसनाधीन मुलांनी आपला अनुभव व्यक्त केला. यावेळी बोलताना पोलीस उप-आयुक्त काकासाहेब डोळे यांनी उपस्थित सर्व महिला, गृहिणीसमिती, सामाजिक कार्यकर्ते यांचे दिशा उपक्रमामध्ये सहभागी झालेबददल अभिनंदन केले. महिला,गृहिणी समिती व समन्वयकांच्या माध्यमातून व्यसनाच्या आहारी गेलेले बालक तसचे शाळाबाह्य बालकांना गुन्हेगारी मार्गावर जाण्यापासून परावृत्त करुन त्यांना योग्य प्रवाहात आणण्यासाठी पोलीस दलाकडुन आणखी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. दिशा उपक्रमअंतर्गत संपुर्ण पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे हददीमध्ये 74 कार्यक्रम घेण्यात आले. तसेच शाळाबाहय बालकासाठी समुपदेशन करण्यात आलेल्या बालकांची संख्या 345 असुन व्यसनमुक्ति केंद्रात दाखल केलेल्या बालकांची संख्या- 02 व्यसनमुक्ति संदर्भात समुपदेशन करण्यात आलेल्या बालकांची एकूण संख्या 214, दिशा उपक्रम संदर्भात राबविलेले इतर उपक्रम 25 तसेच एकूण 14शाळाबाहय बालकांना कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नसताना जिल्हा परिषद शाळेत अँडमिशन करुन दिले. (रावेत-7, तळेगाव5. भोसरी एमआयडीसी 2), भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशन हददीत बालाजीनगर झोपडपटटी येथेविदयार्थ्यांसाठी वाचनालय सुरु केले. त्यासाठी लागणारेकपाट, पुस्तके उपलब्ध करुन देण्यात आली. दिशाउपक्रम अंतर्गत एकूण 12 शाळाबाहय मुलांना “तेरे देस होमस” या सामाजिक संस्थेच्या मदतीने कोहीनुर इन्स्टीटूट काळभोरनगर येथे मोफत मोबाईल रिपेअरिंग कोर्स उपलब्ध करुन सुरु देण्यात आला आहे. दिशा उपक्रम अंतर्गत चांगली कामगिरी करणारे रावेत, भोसरी एमआयडीसी, तळेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अंमलदार, समन्वयक यांचा देखील गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे आभार पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 काकासाहेब डोळे यांनी व्यक्त केले. केले तसेच कार्यक्रमाचे आयोजन निगडीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे, पोलीस निरीक्षक, गुन्हे देवेंद्र चव्हाण, विशेष बालपथकाचे संपत निकम (श्रेणी पोलीस उप-निरीक्षक), दिपाली शिर्के, अमोल मुठे, भूषण लोहरे यांनी केले.