झिंजुर्डे मळा पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावा – शत्रुघ्न काटे

0
239

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) : नगरसेवक शत्रुघ्न यांनी पिंपळे सौदागर येथील झिंजुर्डे मळा या ठिकाणी पालिका पाणीपुरवठा विभाग अधिकाऱ्यांसोबत पाहणी केली.झिंजुर्डे मळा परिसरातील नागरिकांना होणारा अनियमित व अपुरा पाणीपुरवठा संदर्भात तक्रार मिळाल्यानंतर नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी तातडीने सदर ठिकाणी पाणीपुरवठा विभाग अधिकारी सोबत पाहणी केली. प्रत्यक्षात असलेली परिस्थिती जाणून घेण्यासाठी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी झिंजुर्डे मळा याठिकाणी जाऊन स्थानिक रहिवासीयांची भेट घेत परिस्थितीचा आढावा घेतला.

यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी झिंजुर्डे मळा परिसरातील बैठे घरांमधील तसेच सोसायटीचे सद्या असलेले नळ कनेक्शन हे जुन्या लाईन वरून नविन टाकण्यात आलेल्या पाणीपुरवठा लाईनवर स्थलांतरित करण्याच्या सूचना दिले आहेत जेणे करून झिंजुर्डे मळा परिसरात होणारा अनियमित व अपुरा पाणीपुरवठाचा प्रश्न मार्गी लागेल .यावेळी पाणीपुरवठा विभाग कनिष्ठ अभियंता जय कानडे , बाळासाहेब काटे इतर पदाधिकारी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.