ज्येष्ठ महिलेला मारहाण करत दिली धमकी

0
297

पिंपरी, दि.२७ (पीसीबी)- घराचा वाद न्यायालात सुरु असतानाही घरावर ताबा मिळवण्यावरून ज्येष्ठ महिलेला कोलाने माराहाणकरत तिच्या नातवाला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. हा प्रकार बुधवारी (दि.24)सकाळी पिंपरीतील नेहरुनगर येथे घडला आहे.

याप्रकरणी 72 वर्षीयमहिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन महिला आरोपी व सचिन संजयतहसिलदार (वय 33) व राहूल संजय तहसीलदार (वय 30, दोघे रा. पिंपरी) यांच्यावर गुन्हादाखल कऱण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,. फिर्यादी व आरोपी यांच्यात चाळीताल घरावरून न्यायालयात केस सुरुआहे. हे माहिती असताना देखील आरोपीने मजुरांकरवी घराची कौले काडण्यास सुरुवातकेली. यावेळी फिर्यादी यांनी हटकले असता फिर्यादीचा हात पिरगळून कौलाने मारहाणकेली. तसेच फिर्यादी यांच्या नातवाला मारहाण केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.