ज्येष्ठ पत्रकार अशिष चांदोरकर यांचं सकाळी हृदयविकाराने निधन

0
265

पुणे, दि.२१ (पीसीबी) – ज्येष्ठ पत्रकार अशिष चांदोरकर यांचं आज सकाळी राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे.

सामनातून आपल्या पत्रकारितेची सुरुवात करून पुढे केसरी, लोकसत्ता मध्ये देखील आपली पत्रकारिता केली महाराष्ट्र टाईम्स मध्ये उपसंपादक म्हणून देखील त्यांनी तब्बल 9 वर्ष काम केलं देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीवर मॅन ऑफ मिशन महाराष्ट्र या पुस्तकाचं लेखन देखील त्यांनी केलं होतं.

महाराष्ट्र टाईम्समधून राजीनामा दिल्यानंतर त्यांनी सर्वज्ञ मीडिया सर्व्हिसेस या स्वतःच्या संस्थेची सुरुवात केली होती. लवंगी मिरची या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फुडी आशिष या नावाने त्यांनी खाद्यभ्रमंती वर आधारित एक शो देखील सुरू केला होता.

संध्याकाळी पाच वाजता त्यांच्यावर वैकुंठ अंत्यसंस्कार होणार आहेत.