ज्‍येष्‍ठ नागरिकाला टोळक्‍याकडून मारहाण

0
48
crime

महाळुंगे,दि.26 (पीसीबी)
एका ज्‍येष्‍ठ नागरिकाला दहा जणांच्‍या टोळक्‍याकडून मारहाण करण्‍यात आली. ही घटना पाईट रोडवर बुधवारी (दि. २५) सकाळी घडली. याप्रकरणी परस्पर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत कल्‍याण, मुंबई येथे राहणार्‍या ६२ वर्षीय नागरिकाने महाळुंगे पोलीस ठाण्‍यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रितम आनंत जाधव, महिला आरोपी, अनंत सिताराम जाधव, प्रसाद बाळू मरगज, अभिषेक बाळू मरगज (सर्व रा. पाईट रोड, ता. खेड, जि. पुणे) तसेच त्‍यांचे पाच साथीदार (नाव, पत्‍ता माहिती नाही) यांच्‍या विरोधातही गुन्‍हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार फिर्यादी यांच्‍या जागेतुन जाणारा पाण्याचा पाइप लिकेज होवुन चिखल झाला होता. त्‍यामुळे फिर्यादी यांनी तो पाइप दुरूस्‍त करून घ्‍या, असे प्रितम आनंत जाधव यांना सागितले. या कारणावरून आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ करुन दगड फेकुन मारले. फिर्यादी यांच्‍या दोन्ही मुलांनाही हाताने मारहाण केली. तसेच फिर्यादी हे साक्षीदार यांच्‍या सोबत प्रितम जाधव याच्‍या विरुध्द तक्रार देण्यास जात होते. त्या कारणावरुन चिडुन प्रितम जाधव याचे वडील आनंत सिताराम जाधव याने इतर उर्वरीत आरोपींनी बेकायदा जमाव करुन फिर्यादी यांची रिक्षा अडवून त्यांना हाताने, लाथाबुक्याने मारहान केली आहे.

याच्या परस्पर विरोधात ३२ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार अशोक दत्तू तुळवे, सुरज अशोक तुळवे, तोलानी, दोन महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांच्या घराशेजारी ग्राम पंचायतची पाईप लाईन लिकेज असल्याच्या कारणावरून फिर्यादी आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.