ज्येष्ठ नागरिकाला काठीने मारहाण, पाच जणांवरुद्ध गुन्हा दाखल

0
91

दि. २० ऑगस्ट (पीसीबी ) महाळुंगे,
जागेच्या भांडणातून पाच जणांनी एका ज्येष्ठ नागरिकाला काठीने मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 18) दुपारी चार वाजता खेड तालुक्यातील आखतुली येथे घडली.

विष्णू आप्पाजी घुडे (वय 75, रा. आखतुली, खेड) यांनी याप्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोपट दामू घुडे, तुषार शिवाजी घुडे, राघू नामदेव घुडे, ज्ञानेश्वर राघु घुडे, शिवाजी सिताराम घुडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व आरोपी यांच्यात जागेवरून वाद आहे. याच वादाच्या कारणातून आरोपींनी शिवीगाळ करत वेळूच्या काठीने फिर्यादी व त्यांचा चुलत भाऊ चिंधू घुडे यांना मारहाण केली. यामध्ये दोघे जखमी झाले आहेत. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.